सध्या देशाला सहकारची आवश्यकता आहे.सक्शम समाज निर्माण करण्याची ताकद सहकारमधे आहे. सहकाराच्या माध्यमातून देशातील सर्व क्षेत्रामधे प्रगती होत आहे. हा हेतू समोर ठेऊन शासनाने सहकार कायद्यामधे सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने सहकार कायद्यामधील आमूलाग्र बदल होऊन 97 वी घटना दुरुस्त करण्यात आली. आपणही त्याला अनुरूप आदर्श उपविधी मधे काही दुरुस्त्यासह दि. 10.04.2013 च्या सर्वसाधारण सभेमधे मंजूर करून घेतल्या आहेत.
या घटना दुरुस्तिचा एक भाग म्हणून “वीणा संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार” या ब्रीद वाक्यामधे संस्कराचा भाग म्हणून सभासदाना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमास सुरूवात केली.
गतवर्षीच्या अहवालमधे उल्लेख केल्याप्रमाणे तकीत कर्ज वसुली करून एन.पि.ए. कमी करण्याच्या प्रयत्नला चंगके यश मिळाले असून तो गेल्या वर्षीच्या पेक्षा हा अहवाल सादर करेपर्यंत सुमारे 542.00 लक्ष विक्रमी वसुली झाळी असल्याने एन.पि.ए. बर्यापैकी आटोक्यात आणण्यात संचालक मंडळास यश लाभले आहे.
आर्थिक वाटचाल
सन 2013-14 मध्ये बँकेने ठेवी,कर्जे व एन.पि.ए. वसुली ही सर्व उद्दिष्टे पार केली आहेत. बाजारातील आर्थिक चनचन ,वाढती महागाई, वसुलिटील अडचण व दुष्काळ ह्या सर्व बाबींवर बँकेने आपली उद्दिष्टे साध्य केल्याबद्दल मला सर्वांचे कौतुक आहे.
बँकेस 2013-14 मधे केवळ नफा रु.42.74 लक्ष झाला. आगामी 201415 मधे रु.93.36 लक्ष एवढे ठेवले आहे.
व्यावसाय वाटचाल:
गेल्या वर्षी बॅंकेची एकूण कर्जे रु.9535.44 लक्ष होती. ती 31/03/2014 मधे रु.10211.29 लक्ष झाळी आहेत. म्हणजे कर्जतही रु.675.85 लक्ष वाढ झाली असून टक्केवारीनुसार 6.61% वाढ आहे.
बँकेने 125.00 कोटी तेवीनचे उद्दिष्टे 2012-13 मध्येच ओलांडले आहे. 31/03/2014 अखेर बॅंकेच्या ठेवी. रु.138.18 कोटी इतक्या आहेत व 31/03/2015 रोजी त्या रु.160.0 कोटी होतील असा विश्वास आहे.
बँकेचा एकत्रित व्यवसाय 2012-13 अखेरीस रु.223.48 कोटी इतका होता तो 2013-14 मध्ये रु.240.70 कोटी झाला असून टक्केवारीनुसार तो 12.4% वाढला आहे.
आगामी काळात बॅंक रिज़र्व बँकेकडे वाळूज,सिडको ,शेंद्रा, ह्या ठिकाणी मागण्यांसाठी नियोजन करीत आहे.
श्री सुभाष झांबड